Devendra Fadnavis- Bhai Jagtap  Saam TV
मुंबई/पुणे

Bhai Jagtap On Devendra Fadnavis : कल्याणमधील घटनेवरुन काँग्रेसच्या भाई जगतापांचा संताप, थेट गृहमंत्र्यांनाच जाब विचारला

Political News : राज्यात अशी परिस्थिती असताना थोडी लाज असेल तर नाक वर करुन छातीठोकपणे असं सांगू नका, अशा शब्दात भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : कल्याण पूर्व भागात बुधवारी भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचे पडसाद आता उमटू लागले आहे. कारण या मुद्द्यावरुन काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

भाई जगताप यांनी म्हटलं की, काल कल्याणमध्ये संतापजनक घटना घडली. एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पण आम्हाला जी माहिती मिळत आहे प्रकरण या पुढचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सभागृहात छातीठोकपणे सांगत आहेत की मुली किती सुरक्षित आहेत. (Crime News)

केंद्र सरकारने जारी केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB च्या रिपोर्टनुसार, महिला सुरक्षेच्या बाबतीत सगळ्यात चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रात आहे. कुठे नेऊन ठेवलाया आमचा महाराष्ट्र. राज्यात अशी परिस्थिती असताना थोडी लाज असेल तर नाक वर करुन छातीठोकपणे असं सांगू नका, अशा शब्दात भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं. (Latest Marathi News)

पवित्र हाऊसमध्ये तुम्ही अत्यंत खोटं बोलत आहात. केंद्र सरकारने ही आकडेवारी दिली आहे. तसं असेल तर केंद्राने दिलेली आकडेवारी खोटी आहे सांगा. कल्याण आणि इतर भागातील घटना महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा लावणाऱ्या आहेत, असं भाई जगताप यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात राजकीय उलथापालथ; पाहा VIDEO

पुण्यातील IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला धडक, तरूणी थेट चाकाखाली चिरडली

Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

Maharashtra Live News Update: अकलूजमध्ये तिरंगी लढत; मोहिते पाटीलविरुध्द भाजप सामना

बीडमध्ये भाऊ -बहिणीची प्रतिष्ठा पणाला? संध्या देशमुखांच्या एन्ट्रीमुळे राजकीय तापमान वाढलं|VIDEO

SCROLL FOR NEXT