Nitin Desai Death Inquiry: नितीन देसाई मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Nitin Desai Death Inquiry: नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
Devendra Fadnavis on Nitin Desai Death Inquiry
Devendra Fadnavis on Nitin Desai Death InquirySaam TV
Published On

Devendra Fadnavis on Nitin Desai Death Inquiry: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. कर्जत येतील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (१ ऑगस्ट) दुपारसच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना कुणी आत्महत्येस प्रवृत्त तर केलं नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सर्व पुरावे आहेत, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता.

Devendra Fadnavis on Nitin Desai Death Inquiry
Nitin Desai Audio Clips: नितीन देसाई मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; 'त्या' ११ ऑडिओ क्लिपमध्ये काय? प्रत्येक शब्दातून होणार उलगडा

काहीजण वसुलीसाठी त्यांच्या मागे लागली होती. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. अशोक चव्हाण यांच्या मागणीवर उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

त्याचप्रमाणे एका मराठी माणसाने तयार केलेला एनडी व्हिडीओ नितीन देसाई यांची आठवण म्हणून तो कसा ठेवता येईल, राज्य सरकारला त्यासाठी काय करता येईल, याबाबत आम्ही कायदेशीर बाबी तपासू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Devendra Fadnavis on Nitin Desai Death Inquiry
Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का! 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आली मोठी अपडेट

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचा हरहुन्नरी कलावंत आपल्यातून निघून जाणे हे अतिशय वेदनादायी आहे. नितीन देसाई यांच्यावर काही कर्ज झालं होतं. या कर्जामुळे त्यांचा स्टुडिओ गहाण होता. दुर्देवाने एनसीएलटीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला होता. देसाई आपला स्टुडिओ सोडवण्याचा प्रयत्न करत होते, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, एनसीएलटीच्या माध्यमातून कुठेही जाणीवपूर्वक नितीन देशमुख यांचा एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचा कुणाचा प्रयत्न होता का? नियमाच्या बाहेर जाऊन त्यांनी घेतलेल्या कर्जावर जास्त व्याज घेण्याचा प्रयत्न झाला का? या सगळ्या गोष्टीची चौकशी निश्चितपणे सरकार करेल, त्याचप्रमाणे हा स्टुडिओ सरकारला कसा ताब्यात घेता येईल, याबाबत आम्ही कायदेशीर बाबी तपासू, असं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com