Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का! 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आली मोठी अपडेट

Shivsena 16 MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
Shivsena 16 MLA Disqualification case big blow to Uddhav Thackeray Supreme Court postponed the hearing
Shivsena 16 MLA Disqualification case big blow to Uddhav Thackeray Supreme Court postponed the hearingsaam tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Shivsena 16 MLA disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेच्या याचिकेची सुनावणी 18 सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत देखील याच दिवशी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी तब्बल दीड महिना लांबणीवर गेल्याने ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Shivsena 16 MLA Disqualification case big blow to Uddhav Thackeray Supreme Court postponed the hearing
Nitin Desai News: नितीन देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला? शवविच्छेदन अहवाल आला समोर, सिनेसृष्टीत खळबळ

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यानंतर राज्यातील राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. शिवसेना ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

या आमदारांना अपात्र करण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला होता.

मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यायला उशीर घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.

Shivsena 16 MLA Disqualification case big blow to Uddhav Thackeray Supreme Court postponed the hearing
Uddhav Thackeray News: मणिपूर, संभाजी भिडे आणि भाजप... उद्धव ठाकरे १० मिनिटांत बरंच काय बोलून गेले

विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते.

यावर 31 जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली. आता 16 आमदार अपात्रतेसंदर्भात 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. याचबरोबर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत देखील याचिका केली होती.

या याचिकेवर सुद्धा 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने पुन्हा सुनावणी लांबणीवर टाकल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाला पुन्हा एकदा दिलसा मिळाला आहे. आता 18 सप्टेंबरला या दोन्ही सुनावण्यांमध्ये कोर्ट नेमका काय निर्णय देणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com