Uddhav Thackeray News: मणिपूर, संभाजी भिडे आणि भाजप... उद्धव ठाकरे १० मिनिटांत बरंच काय बोलून गेले

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv
Published On

Uddhav thackeray News: देशाचं आणि राज्यातील राजकारण मणिपूर महिला अत्याचार प्रकरण आणि संभाजी भिडे प्रकरणावरून चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्ग अपघात, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'समृद्धी महामार्गावर अपघात झाला. तो अपघात कसा झाला,याची चौकशी व्हावी. तसेच नितीन देसाई यांचीही घटना वाईट आहे. तो मोठा धक्का आहे. त्यांच्या लेखी अशक्य असं काही नव्हतं. असा कलाकर जाणं वाईट आहे'.

Uddhav Thackeray
Sambhaji Bhide News: तो आवाज कुणाचा? व्हाइस सॅम्पल घेणार, संभाजी भिडेंना ८ दिवसांत पोलीस ठाण्यात बोलावलं

संभाजी भिडे प्रकरणावर सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'संभाजी भिडेंवर सरकारने बोलायला पाहिजे. गुरुजी ते त्यांना मानत असतील, तर सगळं बरोबर आहे असच समजावं लागेल. गुरुजींनी चांगले धडे द्यावेत'.

Uddhav Thackeray
Solapur News: सोलापुरात भिडेंच्या समर्थानात मोर्चा, पोलिसांनी केला लाठीमार

मणिपूरच्या घटनेवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'मणिपूरमध्ये सरकार आहे की नाही? तिकडे राज्यपाल महिला आहेत. तरी महिलांसोबत असा प्रकार होत आहे. माझ्याकडे शब्द नाहीत तर मग डबल इंजिन सरकार आहे कुठे? भाजप हे सरकार चालवू शकत नाही हे समोर आलं आहे'.

'महाराष्ट्रात सरकार नव्हतं म्हणून फोडाफोडी केली. भाजप राज्यकर्ते होऊ शकत नाहीत. महिलांचा आदर न करणे हे आमच्या हिंदू राष्ट्र आणि रामराज्यात बसत नाही. तुमचा अधिकार लव्ह जिहादवर बोलायचा नाही. मणिपूरमध्ये काय होतंय? तर पुलवामाबद्दल पण कोणी उत्तर दिले नाही. सत्यपाल मलिक जे म्हणाले ते महत्वाचे आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com