ठाकरे बंधूंची युतीची घोषणा
काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा
काँग्रेसच्या भूमिकेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं भाष्य
दोन ठाकरेंनी आज महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली आहे. दोन्ही नेते आता एकत्र निवडणूक लढणार आहेत. मात्र, या निवडणुकीदरम्यान ठाकरेंपासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष दूर गेल्याचं दिसत आहे. या निवडणुकीच्या स्पर्धेत काँग्रेस नेमकी कुठंय, यावर मोठं भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात बोलताना केलं.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आशय बघता, यात राजकीय भूमिका घेऊ लागले आहेत. ही चुकीची आहे. ७३ आणि ७४ व्या घटनादुरस्तीनुसार, सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गावगाडा चालवणाऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, ही भूमिका आहे. ग्रामसेवा आणि ग्रामपंचायतमध्ये कोणताही राजकीय पक्ष असू शकत नाही. ना जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिकांमध्येही दिसू शकत नाही. यात चांगल्या संवादाची आवश्यकता असते. सभा आणि पैसा , दबावाने निवडणुका लढल्या जात आहेत. हे चुकीचं आहे'.
'महानगरपालिका निवडणुकांचं समजू शकतो. पण इतर निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचा हट्ट का, हा मूलभूत प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांची सत्तेची भूक ही यातून दिसून येत आहे. महाराष्ट्रात २९ महानगरपालिका आहेत. तर नगरपालिका या २८८ आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी दोन बंधू एकत्र आले आहेत. यात कुठेतरी असमतोल झाला आहे. दोन पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. तो त्यांचा पक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.
'काँग्रेसची भूमिका ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याचे अधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. काही ठिकाणी आम्ही मित्र पक्षांना पाठिंबा दिला आहे. काही ठिकाणी मित्र पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सर्व ठिकाणी आमची जी भूमिका आहे, तीच आता आमची भूमिका आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.
'आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की, तुम्ही दरवेळी आघाडी करता. आमची लढण्याची इच्छा आहे. आघाडी केल्यामुळे आम्हाला कमी जागा मिळतात. त्यामुळे आमची कोंडी होते. त्या भूमिकेतून आम्ही स्वबळावर लढण्यास गेलो. स्वबळावर जाण्याचा आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचं काय? हे प्रश्न गैरलागू आहेत, असे सपकाळ यांनी पुढे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.