Milind Deora  Saam TV
मुंबई/पुणे

Milind Deora News : मुंबईत काँग्रेसला खिंडार; मिलिंद देवरा CM एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार

Mumbai Political News : मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडले, अशी माहिती देखील समोर येत आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मुबंईत जोरदार झटका बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत मिलिंद देवरा यांनी याबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवरा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर देखील याचे परिणाम होताना दिसतील.

मिलिंद देवरा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आज माज्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षांशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपवत आहे. नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडले, अशी माहिती देखील समोर येत आहे. त्याआधी ते सिद्धीविनायक मंदिरात देखील जाणार आहेत.

सिद्धीविनायक दर्शनावेळी शिवसेना आमदार सदा सरवणकर देखील उपस्थित असतील. मिलिंद देवरा यांच्यासोबत १० माजी नगरसेवक, २० पदाधिकारी, १५ महत्त्वपूर्ण व्यापारी संघटना आणि ४५० कार्यकर्ते आज शिवसेना पक्षात सामील होणार आहेत.

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. ते दक्षिण मुंबई येथून 2004 आणि 2009 मध्ये खासदार राहिले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT