पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याच्या राहणीमानाच्या निर्देशांकाचं स्थान वरचं आहे, असा दावा सत्ताधारी भाजप BJP करतं आहे. मात्र यावरती विरोधक मात्र आक्षेप घेत आहेत. पुण्याचा राहणीमान निर्देशांकाचं स्थान देशात वाढत आहे असा सत्ताधारी भाजपचा दावा आहे मात्र भाजपच्या या दाव्यावर विरोधकासह सामान्य पुणेकरांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
हे देखील पहा -
पुण्याचा राहणीमान निर्देशकांचं स्थान देशभरात चढते असून यासाठी 'मर्सर' (Mercer) या संस्थेच्या निर्देशांकाचा दाखला दिला जातोय. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात हे स्थान चढते आहे, असा दावा भाजपनं केला आहे. भाजपच्या या दाव्याची विरोधात असलेल्या कॉंग्रेसनं मात्र खिल्ली उडवलीय. पुण्याचं राहुद्यात मात्र गेल्या चार वर्षात पुण्यातील भाजपच्या नेत्यांचा राहणीमान निर्देशांक किती वाढला? असा सवाल काँग्रेसनं विचारलाय. (Congress criticizes on BJP)
पुण्यात गेल्या चार वर्षात कागदावरच असलेली मेट्रो Metro प्रत्यक्षात धावू लागली. शहराच्या विविध भागात उड्डाणपुलांना मंजुरी मिळाल्या. पाणीपुरवठाही आता 24 तास होणार आहे. असं असलं तरी पुण्याचे प्रश्न संपलेत का? तर त्याचं उत्तर नाही, असं आहे. आणि याचंच प्रतिबिंब सामान्य पुणेकरांच्या प्रतिक्रियेतून उमटत आहे. अलीकडच्या काही वर्षांत पुणे झपाट्याने बदललं. त्यामुळे स्वाभाविकपणे विस्थापितांची संख्याही वेगाने वाढली. त्यामुळेच पायाभूत सुविधांवर ताण येतोय. या पायाभूत सुविधा पुरेपुर वाढवल्या तर कागदावर वाढलेला निर्देशांक प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
Edited By -Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.