केंद्र सरकार चीनचा दलाल म्हणून बसलं आहे का? नाना पटोलेंचा घणाघात

'चीनने हल्ला करणार असल्याच सांगूनही, सरकारची काही प्रतिक्रिया नाही?'
केंद्र सरकार चीनचा दलाल म्हणून बसलं आहे का? नाना पटोलेंचा घणाघात
केंद्र सरकार चीनचा दलाल म्हणून बसलं आहे का? नाना पटोलेंचा घणाघातSaamTV
Published On

रश्मी पुराणीक -

मुंबई : चीन देशाच्या सीमेवरती आहे त्यामुळे देशाला धोका आहे असे असूनही या परिस्थितीवरती केंद्र सरकार काहीच बोलत नाहीये. चीनने China हल्ला करणार असल्याच सांगूनही त्याच्यावरती सरकारची काही प्रतिक्रिया नाही? आपल्या सीमा देखील सुरक्षित नाहीत. भाजपा सरकार BJP Goverment चीनचे दलाल म्हणून बसले आहेत का? असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केला आहे. हे सरकार देशाअंतर्गत आणि देशा बाहेरील प्रश्न हातळण्यामध्ये हे सरकार अपयशी झालं असल्याचही ते म्हणाले.

हे देखील पहा -

देशातील आपल्या विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या पक्षाना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहे. अमित शाह Amit Shah यांच्या मुलाची संपत्ती नऊ पट वाढते त्यांना भीती वाटत नाही इतरांना कशी वाटेल? असंही ते म्हणाले

केंद्र सरकार चीनचा दलाल म्हणून बसलं आहे का? नाना पटोलेंचा घणाघात
भाजपच्या 'या' भूमिकेमुळे त्यांची थट्टा व्हायला लागली आहे- नाना पटोले

सचिन सावंत Sachin sawant यांच्या राजीनाम्या संदर्भात विचारलं असता ते म्हणाले मला अजून पत्र आले नाही याबाबत मी बसून चर्चा करीन मात्र प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे त्यांची नाराजी असेल तर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं. दरम्यान त्यांना आर्यन खानच्या Aryan Khan अटकेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले आपल्या देशात ड्रग्ज निर्माण होत नाही मग गे ड्रग्ज Drugs देशात आलेच कसे ? तसेच बेरोजगारी, गरिबी, महागाई, शेतकरी हे प्रश्न आमच्या समोर आहेत असं पटोले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com