Maharashtra Political News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची नवी रणनिती; भाजपचा प्लान होणार फेल?

Maharashtra Congress Strategy: काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांना देखील हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Satish Daud

Maharashtra Political News

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. आता चव्हाण हे १२ ते १५ आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी काळात काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता काँग्रेस हायकमांड अलर्ट मोडवर आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांना देखील हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला देखील मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या काँग्रेसोबत किती आमदार चव्हाण यांच्या संपर्कात आहेत, हे स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

या बैठकीमुळे आमदारांचा कल कसा आहे, जाणून घेण्यासही पक्ष नेतृत्वाला मदत होणार आहे. याशिवाय जे काँग्रेस आमदार सध्या काठावर आहेत, त्यांची मनं वळवण्याचाही प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रत्येक आमदारांसोबत फोनवरून संपर्क देखील साधत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश देऊन महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस हायकमांड अलर्ट झालं असून सतर्कता बाळगली जात आहे.

अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे इतर आमदार फुटू नये म्हणून हायकमांडने प्रयत्न सुरू केले आहेत. बैठकीच्या निमित्ताने सर्व आमदारांना एकत्रित बोलावून त्यांना गुप्त ठिकाणी ठेवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जर असं झालं, तर भाजपचा पुढील प्लान फेल होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT