Nana Patole Congress Andolan in pune
Nana Patole Congress Andolan in pune SAAM TV
मुंबई/पुणे

Congress Andolan: मोदी नावाची व्यक्ती उभी करून RSS-भाजपने षडयंत्र रचलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

Chandrakant Jagtap

Congress Andolan: भाजप आणि आरएसएसने २०१४ मध्ये मोदी नावाचे व्यक्ती उभा करून षडयंत्र रचलं, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेसकडून अदानी समूहातील गैरव्यवहाराविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला.

पुण्यातील अलका टॉकीज चौकात असलेल्या एलआयसी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, देश उभा करण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. आरएसएस आणि भाजपने खोटे स्वप्न दाखवत २०१४ मध्ये मोदी नावाचे व्यक्ती उभा करून षडयंत्र रचले. भाजपने खोटं बोल पण रेटून बोल असे करत जाती धर्माच्या नावाखाली लढून सरकार आणले. नोटबंदी, जीएसटी यासारख्या गोष्टी भाजपने केल्या आणि सर्वसामान्य लोकांचे पैसे जमा करून त्यांनी त्यांच्या मित्राकडे देण्याचे काम केले, अशा शब्दात पटोलेनी भाजपवर टिकास्त्र सोडले. (Latest news in marathi)

पुढे बोलताना ते म्हणाले की, २०१४ मध्ये मोदी यांनी स्टॅलिनचा उल्लेख केला होता. स्टॅलिनचा विचार भयानक होता. स्टॅलिनने सत्ता टिकवण्यासाठी रशियामध्ये मुस्लिमांना त्रास दिला. विरोधी पक्ष संपवण्याचं काम देखील त्याने केले, अशा शब्दात पटोले यांनी मोदींवर देखील टिका केली.

आम्ही येथे एलआयसी कार्यालयाबाहेर आलो, पण त्यांनी गेट बंद केले. अदानी यांनी खोट्या कंपनी तयार केल्या आणि एलआयसीमधून पैसे घेतले. आता हे सिद्ध झालं झालं आहे की, मोदी सरकार जनतेच्या पैशाची लूट करत आहे.

आमचा आवाज दाबला जात आहे. संसदेत देखील आम्हाला बोलू दिले जात नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत आम्ही जनतेच्या पैशाचा हिशोब मागत आहोत, पण त्यावरही हे बोलायला तयार नाहीत. विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नाचे उत्तर या सरकारने दिले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

नरेद्र मोदी आरोपीच्या पिंजऱ्यात - नाना पटोले

भाजपचे सरकार हुकुमशाही करत आहे. आज नरेद्र मोदी आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. यांनी नेमलेले जजेस असतील तर न्याय कसा मिळणार? असे पटोले म्हणाले. आम्ही कोणाला घाबरलो नाही. शाहाचे पोलीस असोत किंवा फडणवीसांचे पोलीस असोत आम्ही न्यायाची लढाई लढणार आहोत. कसबा निवडणुकीत आपण जिंकलो तर भाजपच्या पायाखालची जमीन सरकेल आणि मग अदानीची चौकशी होईल, असे नाना पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair care Tips: केसांना एलोवेरा जेल कधी लावावे?

Relationship Tips: बॉयफ्रेंडचं असं वागणं म्हणजे ब्रेकअपचे संकेत; तुटण्याआधी वाचवा नातं

IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

Thane Railway Station Fire : ठाणे रेल्वे स्टेशनवर जाहिरात फलकाला आग

BJP Vs RJD: ब्रेकिंग! बिहारमध्ये भाजप- आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जखमी; इंटरनेट सेवा बंद

SCROLL FOR NEXT