Kasba Peth By-Election: 'आता नंबर बापटांचा का…?'; कसब्यात झळकले पोस्टर, भाजपच्या उमेदवारीवरुन नाराजी

मुक्ता टिळक यांच्या कुटूंबियाला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Girish Bapat
Girish BapatSaam TV

Pune: पुण्यात चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. भाजपाने कसबा पेठ मतदार संघात मुक्ता टिळक यांच्या कुटूंबियाला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या उमेदवारीवरुन जोरदार नाराजी व्यक्त केली जात असून पुण्यात बॅनरही लावण्यात आले आहेत. ( Pune News)

Girish Bapat
NCP नेत्यांना पडळकरांनी संबाेधिले जितुद्दीन, अजरूद्दीन, शमशुद्दीन, रज्जाक; जनता त्यांची दखल घेईल

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठीतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही . यानंतर शहरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठीतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही . यानंतर शहरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

Girish Bapat
Tushar Gandhi : ...त्यामुळे नोटांवर गांधीजींचा फोटो नसावा; तुषार गांधींना असं का वाटतं?

या पोस्टरवरती "कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का...??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार" असा मजकूर लिहण्यात आलेला आहे. हे फ्लेक्स पुणे शहरातील काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. दरम्यान हा फ्लेक्स नेमका कोणी लावला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, आज भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हेमंत रासने निघाले. त्यांनी कसबा ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत पायी रॅली काढली या रॅलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थितीत होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com