Pune Porsche Accident Case Shocking VIDEO Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न

Satish Daud

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. कल्याणीनगर भागात घडलेल्या या घटनेत एका तरुणासह, तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी रात्री पोलिसांनी विशाल अग्रवाल यांना अटक देखील केली. हिट अँड रनच्या या घटनेमुळे पुणे शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुण्यातील या अपघातावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तसेच या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणीही वडेट्टीवर यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांनी आपल्या X अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे, असे कळीचे प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारले आहेत.

वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT