Aba Bagul-Ravindra Dhangekar Saam TV
मुंबई/पुणे

Pune Politics : 'मी कोणाच्याही चपला उचलणार नाही', रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल आक्रमक

Pune Political news : राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित करत आबा बागुल भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले.

साम टिव्ही ब्युरो

नितीन पाटणकर | पुणे

Pune Political News :

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीच्या ७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागुल आक्रमक झाले आहेत. मी कोणाच्याही चपला उचलणार नाही. राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात, मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित करत आबा बागुल भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले.

आबा बागुल यांना पुणेकरांनी सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. मात्र तरीदेखील आपल्याला डावललं जात असल्याची भावना आबा बागुल यांची आहे. माझ्यात काय कामी होती, अशी विचारणा आबा बागुल यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केली आहे.

सध्या विद्यमान आमदार असताना धंगेकरांना लोकसभेचं तिकीट देणं कितपत योग्य आहे, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. पुणे काँग्रेसमध्ये या निर्णयामुळे खदखद आहे. निष्ठावंतांवर अन्याय करुन नुकत्याच पक्षात आलेल्याला उमेदवारी देऊन काय साध्य केले? असा सवाल आबा बागुल यांनी उपस्थित केला.

काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो आहे. मित्रपक्षांच्या नेत्यांना सुद्धा भेटून मी माझी क्षमता सांगितली. मात्र तरी मला डावलंल गेलं. पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलं आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. आम्ही महात्मा गांधींना मानणारे आहोत. लोकशाही मार्गाने काँग्रेभवनवर कँडल मार्च काढणार असल्याचा इशारा देखील बागुल यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT