Rohit Pawar News : शासकीय आश्रमशाळेत कोट्यवधींचा दूध घोटाळा, रोहित पवार यांनी फाईलच दाखवली

Rohit Pawar News : मला पाठवण्यात आलेल्या ११ पैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे. पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दुध पुरवठ्याची आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
Rohit Pawar
Rohit Pawar saam tv

नितीन पाटणकर | पुणे

Rahit Poawar News :

राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण ११ फाईल पाठवल्या असून सत्ताधारी पक्षाचाच हा माणूस असं रोहित पवारांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवारांनी पुढे म्हटलं की, मला पाठवण्यात आलेल्या ११ पैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे. पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दुध पुरवठ्याची आहे. ⁠आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २०० मिली दूध पुरवले जाते. या दूध पुरवठ्यासाठीचा ⁠पहिला करार २०१९ मध्या झाला आहे. या करारात ४६.४९ रुपये दर होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर ४९.७५ रुपये होते. त्या दराने दुध पुरवठा होत होता.

Rohit Pawar
Gadchiroli Politics : काँग्रेसचा आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवारच भाजपच्या गळाला; गडचिरोलीतील राजकारणाला कलाटणी

राज्यात ५५२ आश्रमशाळा आहेत. आदिवासी समाजातील लहान मुलं तिथे शिकतात. मात्र ⁠२०२३-२४ मध्ये मात्र हा दर १४६ रुपये दर झाला आहे. १६४ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करत आहे. यामध्ये ८० कोटी रुपयांचं कमिशन दिलं गेलं आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. विकास करण्यासाठी तिकडे गेले, असं सांगणाऱ्यांनी हाच विकास करण्यासाठी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

Rohit Pawar
Loksabha Election 2024: खासदार भावना गवळींचा पत्ता कट होणार? शिंदे गटाचे संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शेतकऱ्याकडून ३० रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना १४६ रुपये दराने दिले जात आहे. ⁠या विरोधात पीएमओ, सीएमओ, ॲन्टीकरप्शनकडे तक्रार देणार आहे. ⁠पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खाजगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे, असं देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com