Loksabha Election 2024: खासदार भावना गवळींचा पत्ता कट होणार? शिंदे गटाचे संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

Maharashtra Politics News: शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गट संजय राठोड यांना लोकसभा रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे.
Maharashtra Politics News:
Maharashtra Politics News:Saamtv

संजय राठोड, प्रतिनिधी|ता. २२ मार्च २०२४

Yavatmal Washim Loksabha Constituency:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडीाना वेग आला आहे. राज्यात महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गट संजय राठोड यांना लोकसभा रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे.

संंजय राठोड लोकसभेच्या रिंगणात?

ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना लोकसभेच्या रिंगणात उतविल्यानंतर शिंदे गटाकडून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी भाजपा आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरागडचा विकास केल्याने मंत्री संजय राठोड यांची बंजारा समाजावर मोठी पकड आहे.

भावना गवळींचा पत्ता कट?

त्यामुळेच संजय राठोड यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यास भाजप आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राठोड यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे. दरम्यान, संजय राठोड यांना उमेदवारी दिल्यानंतर विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांचा पत्ता कट होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics News:
Sambhajinagar Corporation : ४ हजार २०० मालमत्ताधारकांनी लावून घेतला कर; १ एप्रिलपासून वाढीव कर आकारणीची भीती

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्याबाबत प्रचंड नाराजी असल्याची माहितीही सर्वेमधून समोर आली होती. त्यामुळेच भावना गवळी यांचा पत्ता कट होऊन संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मंत्री संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास ठाकरे गटाला निवडणूक जड जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics News:
Dharashiv News: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फोडली; आता 'मनसे'च्या मागे... खासदार ओमराजेंचे भाजपवर टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com