Hardik pandya News  saam tv
मुंबई/पुणे

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

Hardik pandya News : भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या याच्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी एका वकिलाने तक्रार केली आहे.

Vishal Gangurde

क्रिकेटपटू हार्दिक पंड्याविरोधात पुण्यात तक्रार

वकील वाजिद खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली तक्रार

टी-२० वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषावेळी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

अक्षय बडवे, साम टीव्ही

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत सापडला आहे. हार्दिक पंड्याच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. एका वकिलाने पंड्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार करताना वकिलांनी हार्दिक पंड्याचे व्हिडिओ देखील जोडला आहे.

टी२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला धूळ चारली. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाने न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला. या विजयानंतर खेळाडूंचे कुटुंबीय मैदानात आले होते. हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड देखील विजयाचा जल्लोष करण्यासाठी मैदानात आली होती.

मैदानात जल्लोष करताना हार्दिक पंड्याच्या खांद्यावर भारताचा तिरंगा झेंडा होता. तिरंगा परिधान करून अंतिम सामना संपल्यानंतर अश्लील चाळे केल्याचा आरोप वकील वाजिद खान यांनी केला आहे. भारतानं टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि मैदानावर पंड्याने तिरंगा परिधान अश्लील चाळे केले असून राष्ट्रीय गौरव अवमान अधिनियम कायद्याअंतर्गत पंड्यावर कारवाईची मागणी वकील खान यांनी केली.

हार्दिक पंड्याचे विजयानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हेते. या व्हिडिओवरून अनेक नेटकऱ्यांनी पंड्यावर टीका केली होती. या कृत्यावर आता वाजिद खान यांनीही आक्षेप घेतला. त्यानंतर वकील वाजिद खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करत सोबत व्हिडिओ देखील जोडले आहेत. आता पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT