Raj Thackeray Speech  saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार; प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोपाल मोटघरे

Complaint Against MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. वाजीद रजाक सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली असून राज ठाकरे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.  (Maharashtra Breaking News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्यानिर्मित्त मुंबईच्या शिवतीर्थावर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी राज्यातील मस्जिदीवरील भोग्यांच्या प्रकरणावर पुन्हा बोट ठेवलं. "मागील काही दिवसांपासून मस्जिदीवरील भोग्यांचा आवाज पुन्हा वाढला आहे. गेल्या गुढी पाडव्याला मी सांगितले होते, मशिदीवरील भोंगे बंद करा, त्यावरून गेल्या सरकारमध्ये माझ्या मनसैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केलं होतं.  (Latest Marathi News)

"दुसरे एक तर तुम्ही मशिदींवरील भोंगे बंद करण्यास सांगा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, दोनपैकी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही स्पीकर बंद करू, मी मुद्दाम यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. राज्यात अनधिकृतपणे काही गोष्टी उभ्या राहत आहेत त्याकडे लक्ष द्या, असे सांगणार आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशाराही दिला होता.

मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुसलमान पाहिजेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांनाच झोडपले. त्यांच्या लोकांमध्ये जाऊन त्यांना सुनावले, अशी माणसे मला हवी आहेत", असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेला भाषणामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार वाजीद रजाक सय्यद नामक व्यक्तीने पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथील वाकड पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. आता या तक्रारीनंतर पोलिस राज ठाकरे यांच्याविरोधात काय कारवाई करणार याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT