निवृत्ती बाबर, साम टीव्ही
Mahim Dargah News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने प्रशासनाने माहीम येथील समुद्रातील अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकला आहेत. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात या अनाधिकृत बांधकामाचा व्हिडीओ दाखवला होता. (Maharashtra Breaking News)
प्रशासनाकडून हे बांधकाम हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सुद्धा त्यांनी केली होती. इतकंच नाही तर, महिनाभराच्या आत यावर कारवाई झाली नाही, तर त्याच्यासमोर भव्य गणपती मंदिर उभारू असा, इशारा देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे.
दरम्यान, या कारवाईसाठी प्रशासनाकडून सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचं पथक याठिकाणी पोहोचलं होतं. अनाधिकृत बांधकाम पाडत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अखेर दोन जेसीबीच्या मदतीने हे बांधकाम पाडण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
याप्रकरणी माहीम दर्गा ट्रस्टकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली होती. ही मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला होता. जर हा दर्गा हटवला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.