Pune Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: तरुणावर काळाचा घाला; देवदर्शनावरून परतताना दुचाकीचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

भिमाशंकर मंचर मार्गावर शिनोलीजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

Pune Accident News : पुण्यातील अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील मंचर येथील महाविद्यालय तरुण भिमाशंकर देवदर्शनावरून परतताना भिमाशंकर मंचर मार्गावर शिनोलीजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या (Pune) मंचर येथील महाविद्यालय तरुण भिमाशंकर देवदर्शन करून परतताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. भिमाशंकर मंचर मार्गावर शिनोलीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर झाले आहेत.

या अपघातात जखमी झालेल्या जखमींवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंचर अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थी एकाच दुचाकीवर भिमाशंकर दर्शनासाठी गेले होते. परतीचा प्रवास करत असताना शिनोली येथे अपघात झाला आहे. ओंकार सुमंत असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओंकारच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या राहत्या भागातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडले

दरम्यान, पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले होते.

नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला होता. रात्रीच्या अंधारात भरधाव पिकअप जीपने दोन दुचाकीना उडवले होता. या अपघातात आठ जण चिरडले गेले. यातील 5 जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

SCROLL FOR NEXT