CNG PNG News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा झटका! सीएनजी-पीएनजी दरात मोठी वाढ

जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार 5 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे दर लागू होणार आहेत

साम टिव्ही ब्युरो

Mumbai CNG PNG Price Hike : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या मुंबईकरांना (Mumbai News) पुन्हा एक महागाईचा नवीन झटका बसणार आहे. कारण, मुंबईसह महानगरात सीएनजी-पीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात साडेतीन रुपये तर पीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (Mumbai News Today)

जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार 5 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे दर लागू होणार आहेत. गेल्या महिन्यांत एमजीएलने सीएनजी आणि पीएनजी दरात (CNG PNG) आतापर्यंत अनेकदा वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.

नवीन दरावाढीमुळे मुंबईत सीएनजीचे दर 89.50 रुपये प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर 54 रुपये प्रति एससीएम इतके झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरासह राज्यात महागाईचं प्रमाण वाढलं आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता सीएनजी पीएनजीचे दरही वाढले आहेत.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दरात चढउतार होत आहे. परिणामी भारतीय पेट्रोलियम कंपन्यावर इंधन दरवाढीचा दबाव येत आहे. आज दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 रुपये इतका आहे. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT