मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, घोषणेकडे महाराष्ट्राचे लक्ष ! Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, घोषणेकडे महाराष्ट्राचे लक्ष !

घोषणेकडे महाराष्ट्राचे लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाची corona लाट ओसरल्याने निर्बंध Restrictions हळू हळू प्रमाणात शिथील करण्यात येत आहेत. मात्र, पुणे pune आणि काही जिल्ह्यामध्ये कायम निर्बंध ठेवण्यात आले आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी निर्बंध शिथिल करण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८ वाजता सोशल मीडियाद्वारे social media राज्यामधील जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यामधील निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबईची Mumbai लाईफलाईन असलेली लोकल Local सेवा २ लस Vaccine घेतलेल्या नागरिकांकरिता सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच बरोबर रेस्टाँरंट सुरू ठेवण्याच्या वेळेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पहा व्हिडिओ-

मुंबईतील मॉलस् पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने २५ जिल्ह्यामधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, पुढील २ महिने धोक्याचे असल्याचे मत राज्याच्या टास्क फोर्सने व्यक्त केले आहे. यातच उद्या कोविड टास्क फोर्सची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुंबई लोकल सुरू करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय अपेक्षित आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेन मधून प्रवास करायला मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

२ लस डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवास मुभा द्यावी ही मागणी केली जात आहे. यामुळे टास्क फोर्सच्या बैठकी मध्ये याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना देखील वेळ वाढवून हवी आहे. राज्यामधील कोरोना रुग्ण संख्या आणि विविध भागात काय सूट दिली जाऊ शकते याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. यामुळे उद्या होणारी टास्क फोर्सची बैठक महत्वाची असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT