भूषण शिंदे
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्याजागी भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे स्वत: मुख्यमंत्रीपदावर विराजमन झाले. मात्र, शिंदे गटाच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता 'संजय राऊत दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असतात, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊतांवर केली आहे. (Eknath Shinde News In Marathi )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले,' मिरा-भाईंदरमधील १८ नगरसेवक यांनी आम्हाल पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. या सरकारला पाठिंबा दिला. त्यांबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो'.
'आपण ज्या घडामोडी पाहत आहोत त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. बाळासाहेब यांच्या विचारावर हे सरकार चालत आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना आणि सामान्य माणसांनी आम्ही घेतलेल्या निर्णय आणि सरकारला पाठिंबा दिला आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे', असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
'जो दावा केला आहे, तो खरा ठरेलं. राष्ट्रपतिपदावरील उमेदवार या आदिवासी समाजातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वांनी समर्थन केल आहे. त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि द्रौपदी निवडणूक जिंकतील', असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, 'अद्याप माझा कोणाशीही संपर्क झालेला नाही. पण आमच्या भूमिकेला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे. आम्ही पेट्रोल डिझेलचे कर कमी केले. आज सकाळी मला पंतप्रधान मोदी यांनी फोन करून सूचना केली आणि १८ वर्षाखालील तरुणांना बूस्टर डोस मोफत द्या असे सांगितले'.
'आम्ही स्वतः गडचिरोलीला गेलो आणि प्रत्यक्ष पुरपरिस्थिती पहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितले की सर्व योजनाच्या माध्यमातून मदत केली जाईल आणि शेतकरी वंचित राहणार नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर बोलताना 'आताच निवडणूक आयोगाने पत्र लिहिले आहे आणि ओबीसी आरक्षण होईपर्यंत स्थगिती होईल. माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे नाव जगात मोठे केले. त्यांनी माझ्या भाषणाचे कौतुक केले', असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.