राज्यात अद्याप सरकार अस्तित्वात आलं नाही, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
cm Eknath Shinde and Sanjay Raut
cm Eknath Shinde and Sanjay RautSaam Tv
Published On

नागपूर : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडाचं निशाण फडकवल्याने राज्यात सत्तांतर झालं. भाजपच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra Government) राज्याचा कारभार हाती घेतला. परंतु, बंडखोर आमदारांमुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर (bjp) सडकून टीका करत आहेत. नागपूर दौऱ्यावर असताना राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंड हे भास आहे. शिवसेना (Shivsena) अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडलीय. ५६ वर्षात शिवसेनेवर अनेक संकटं, वादंळ आम्ही पाहिली आहेत. मुळात राज्यात अद्याप सरकार अस्तित्वात आलं नाही, आज दोघांची कॅबीनेट झाली. शपथविधी झाला नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

cm Eknath Shinde and Sanjay Raut
मोठी बातमी! मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला खिंडार, १८ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार

यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, मी फडणवीस यांच्या शहरात आलोय.पक्षाच्या कामासाठी आलोय. सगळं जागच्या जागी आहे. माझं स्वागत करायला सगळे आले आहेत. हे चित्र महाराष्ट्रात दिसतेय.बंड हे भास आहे. शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडलीय.५६ वर्षांत अनेक संकटं,वादळं आम्ही पाहिलीय. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला इथे पाठवलंय.

खासदार कृपाल तुमाने आणि त्यांचे कार्यकर्ते आले नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, मी शिवसैनीकांबाबत बोलतोय. इथे कुणाचे व्यक्तीगत कार्यकर्ते नसतात. शिवसेनेचे कार्यकर्ते असतात. रामटेक विधानसभा मतदार संघातून अनेक जण आले आहेत.त्यांच्यासोबत आज मी बैठक घेत आहे. इथले शिवसैनिक कुणीही बाहेर गेले नाहीत. कुणी आले,कुणी गेले यात वेळ घालवायचा नाहीये. राज्य सरकारने नुकतंच पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला, यावर बोलताना राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे. यातून लोकांना दिलासा मिळत असेल,याबाबत एखाद्या सरकारने निर्णय घेतला असेल,तर त्याचं स्वागत करायला हवं.

cm Eknath Shinde and Sanjay Raut
Bullet Train : मोदींच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला शिंदे सरकारकडून आवश्यक सर्व परवानग्या

शिंदे गटात १५ खासदार सहभागी होणार असल्याचं उदय सामंत म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, नशिब ते ११५ खासदार बोलले नाही. १५ असतील किंवा ११५ असतील.पण येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत सेना खासदारांचा आकडा कायम राहणार. उद्धव ठाकरे यांचे निर्णय बदलले जातात, असं राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, ज्या पद्धतीनं या सरकारचं काम चालू आहे. मागच्या सरकाने जनतेचं आणि राज्याचं हित पाहून घेतले होते.पण विरोधासाठी विरोधया भुमिकेतून हे दोघांचं कॅबीनेट काम करत असेल. तर दिवस बदलतात हे आम्ही पाहू. भविष्यात सत्तांतर होत असतं,त्यामुळे विरोधासाठी विरोध असं काम करु नये. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना त्यांना शपथ घेणं, जर १९ तारखेला शपथ घेत असेल तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com