मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत. केंद्राच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला महाराष्ट्रातील नवनिर्वाचित एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने आवश्यक मंजुरी दिली आहे. (Mumbai Ahmedabad bullet train project)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज, गुरुवारी ही माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी (Bullet Train) राज्यात आवश्यक सर्व मंजुरी देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात मुख्यतः सरकारी जमिनींच्या अधिग्रहणांशी संबंधित समस्यांमुळे बुलेट ट्रेनच्या मार्गात काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. तत्पूर्वी, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून बऱ्याच काळापासून या प्रकल्पाला बाधा आणणारे प्रलंबित मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी हस्तक्षेप करण्यात यावा, अशी विनंती केली होती.
या पत्रात या बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱ्या अडथळ्यांचा उल्लेख करण्यात आला होता.
बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारा सर्वात मोठा आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित मुद्द्यांपैकी एक म्हणजे वन (संरक्षण) अधिनियम, १९८० अंतर्गत मंजुरी मिळण्याशी संबंधित आहे. शर्तींचे पालन आणि अनिवार्य शुल्क जमा केल्यानंतरही मंजुरीसाठी २०२१ मध्ये अर्ज करण्यात आला होता. मात्र, हा मुद्दा आता महाराष्ट्राच्या वनविभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.