Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : ...हा तर आमच्यावर अन्याय आहे; CM शिंदे काय म्हणाले, वाचा...

ठाकरे गटाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknathn Shinde News : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला आता धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर शिवसेना हे नावही लावता येणार नाही. या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाला मशाल हे नवीन निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी नवीन चिन्ह सूचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. दरम्यान, ठाकरे गटाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली. (Eknath Shinde News Today)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

'आमचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. देशातील 14 राज्यप्रमुखांनी देखील त्यांच्या राज्यातील शिवसेनेचं समर्थन आम्हाला दिलेलं आहे. असं हे भरघोस पाठिंबा आणि समर्थन आमच्याकडे म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असताना, धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे होते. परंतू, ते आम्हाला मिळालं नाही. हा आमच्यावरचा खरा अर्थाने अन्याय आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, याबाबतीत आमचा प्रयत्न आहे की मेरीटवर तुम्ही जे इतर निर्णय घेतले. त्या मेरीटनुसार मेरीट वर चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. सोशल मिडियावर आमची बदनामी केली जात असल्याचा दावा देखील शिंदेनी केला आहे.

शिंदे गटाला आज चिन्ह मिळण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला तीन निवडणूक चिन्ह सूचवण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल अशी तीन चिन्ह सूचवण्यात आली होती. तर शिंदे गटानेही त्रिशूल गदा आणि मशाल चिन्ह सूचवली होती.

दरम्यान, धार्मिक वाद होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने त्रिशूल आणि गदा ही दोनही चिन्ह बाद केली आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला नवीन तीन चिन्ह सूचवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार आज शिंदे गटाच्या वतीने निवडणूक चिन्ह सूचवली जाणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT