Shivsena Sanjay Raut, Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

राऊतांच्या घरात सापडलेल्या नोटांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव; प्रकरणाला वेगळं वळण?

10 लाखांच्या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची खळबजनक माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. सध्या त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. ईडीने (ED) राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त देखील जप्त केली आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या घरी जी साडेअकरा लाख रुपयांची रक्कम सापडली त्यापैकी 10 लाखांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Sanjay Raut Latest News)

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. तब्बल 15 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना रविवारी रात्री अटक करण्यात आला आहे. राऊतांच्या भांडुप येथील घरातून ईडीने 11 लाखांची रोकड जप्त केली आहे. या 11 लाखांपैकी 10 लाखांच्या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची खळबजनक माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, 10 लाख रुपयांचे नोटांचे बंडल असणाऱ्या कव्हरवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदार, खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र यासंदर्भातील खुलासा करताना राऊत यांनी हे पैसे शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी बाजूला काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (Sanjay Raut Todays News)

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप

दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’चे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की, लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपावर सोडले.

या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, PSI बदने अन् बनकरबाबत धक्कादायक माहिती

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT