Ekath Shinde Group Guwahati Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहे. सकाळी १० वाजता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला रवाना होणार आहे. गुवाहाटीत जाऊन ते कामाख्या देवीचे दर्शन घेतील. तर इतर आमदार आणि खासदार सकाळी ९ वाजेच्या सुमारास गुवाहाटीला विमानाने रवाना होतील. (Latest Marathi News)
गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनावेळी विशेष पुजाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटातील काही आमदार हे गुवाहाटीला जाणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत गुवाहाटी दौऱ्यावर काही आमदार आणि मंत्री जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी वैयक्तिक कारणांमुळे तर मंत्री व्यस्त कार्यक्रमांमुळे जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा आहे. तर काही बदनामीच्या भितीने जात नसून ढोबळ कारणे पुढे करून जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं. तिथं जेव्हा त्यांच्या राज्यवापसीची वेळ आली.
तेव्हा त्यांनी तिथल्या कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. सोबतीला सगळेच आमदारही होते. आणि तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटी चांगलेच चर्चात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
कामाख्या देवी ही तांत्रिक- मांत्रिकांसाठी महत्त्वाचे दैवत मानले जाते. कामाख्याची पूजा भगवान शंकराच्या नववधूच्या रूपात केली जाते. कामाख्या देवी मुक्ती देते आणि सर्व इच्छाही पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भक्ताने कोणतीही इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून देवीची देशभरात ख्याती आहे.
Ediited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.