cm eknath shinde will attend yatra at malang gad near kalyan Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Malang Gad Yatra : वारकरी महोत्सवातील 'त्या' विधानानंतर एकनाथ शिंदे मलंगगडावर येणार, यात्रेत मुख्यमंत्री काेणती घोषणा करणार?

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan News :

माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारी मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान माघी पौर्णिमेला मलंगगडाच्या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) सहभागी होणार असल्याने या यात्रेत मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केलं होती. गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक ,भाविक हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट ,जय मलंग श्री मलंग घोषणा देत सहभागी होत असतात. आता ही चळवळ चालू राहावी आणि मलंग गडाचा हक्क हिंदूंना मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला.

आनंद दिघेनंतर दरवर्षी मुख्यमंत्री माघ पौर्णिमेला मलंग गडावर जाऊन मच्छिंद्र नाथांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यानुसार यावर्षी देखील 24 फेब्रुवारी रोजी ते यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांना कारवाईच्या सूचना

मलंगगडावर काल दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. काही विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली होती. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारले असता अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्यांवर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशी सूचना केल्याचे खासदार शिंदे यांनी नमूद केले.

हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या वारकरी महोत्सवात मलंग गड मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता मलंगडावरील यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT