Eknath shinde and narayan rane  saam tv
मुंबई/पुणे

Video | दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर नारायण राणे दिसणार का ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

शिंदे गटाच्या मेळाव्यातील व्यासपीठावर नारायण राणे दिसतील का ? यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Eknath Shinde News : राज्यात दसरा मेळाव्याची तारीख जवळ येत आहे, तसं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने महापालिकेकडे अर्ज केला आहे. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने देखील दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवाजीपार्कवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा मेळावा होणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान शिंदे गटाच्या मेळाव्यातील व्यासपीठावर नारायण राणे दिसतील का ? यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले.

शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने महापालिकेला मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

याचदरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दिली. त्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले, 'केंद्रीय नारायण राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट होती. भेटल्यानंतर आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या जुन्या आठवणी निघाल्या. राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. राणे हे देखील माजी मुख्यमंत्री होते. त्यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे राणे यांनी मला सांगितले. आम्ही कमी वेळात चांगले निर्णय घेतले याचेही राणेंनी कौतुक केले. जनतेच्या मनात जी भावना होती, ती आम्ही पूर्ण केली'.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार का ? या मेळाव्यातील व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे दिसणार का ? पत्रकाराच्या या प्रश्नावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'आता गणेशोत्सव आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव आहे. त्याच्यानंतर दसरा आहे. तुम्हाला सर्वच आताच एकदम सांगितलेलं कसं चालेल ?'.

दरम्यान, यावेळी नारायण राणे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला घरी बसवले. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले,असे नारायण राणे म्हणाले. दसरा मेळाव्यावर भाष्य करताना राणे म्हणाले,'सर्वच गोष्टी इकडे सांगायच्या नसतात, ते स्पॉटला गेल्यावर कळेल'.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT