CM Eknath Shinde Narendra Modi Mumbai Speech Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde Speech in Mumbai: मला दावोसमध्ये काही लोक भेटले, तेही मोदींचेच भक्त होते; CM शिंदे काय म्हणाले, वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगभरात कसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा डंका आहे, याबाबत बीकेसीमधील सभेत सांगितले.

Satish Daud

CM Eknath Shinde Narendra Modi Mumbai Speech : 'मी काल-परवा दावोसला(Davos) गेलो होतो. तिथे अनेक जगभरातील विविध देशातून लोकं तसेच राजकीय नेते आले होते. मला अनेक लोकं भेटले. त्यातील काही प्रधानमंत्री होते, अध्यक्ष होते, काही मंत्री होते, ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांबद्दलच विचारायचे', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगभरात कसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा डंका आहे, याबाबत बीकेसीमधील सभेत सांगितले. (Latest Marathi News)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील एक किस्सा देखील सांगितला. 'दावोस येथे गेल्यानंतर एका देशाचे पंतप्रधान माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की मी  पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) भक्त आहे. त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला आणि हा फोटो पंतप्रधान मोदी यांना दाखवा, यावरून जगभरात कसा मोदींच्या नावाचा डंका आहे हे समजतं', असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Maharashtra Political News)

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, 'मला जर्मनीचे काही लोकं भेटलीत, सौदी अरेबियातीलही काही लोकं भेटली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहेत ना.., मी म्हटलं मी त्यांचाच माणूस आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत सांगितलं.

महाविकासआघाडीवर साधला निशाणा

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ज्या कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, त्याचं उद्घटानही त्यांच्याच हस्ते होत आहे. अनेकांनी इच्छा होती, या कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये, मात्र, नियतीपुढे कोणाचंही चालत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. विमानतळावरून मोदींचा ताफा थेट बीकेसीच्या मैदानावर पोहचला. बीकेसीवर पोहचताच ढोल ताशांच्या गजरात मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) महाराष्ट्राच फेटा घालून सत्कार केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा भेट म्हणून दिला

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT