sanjay raut and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी बेकायदेशीर ? संजय राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री म्हणाले...

राज्यात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सदर शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुमित सावंत

मुंबई : शिंदे गटाने बंडखोरी करत राज्यात भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष निर्माण झाला आहे. त्यात बंडखोरीनंतर १६ आमदारांचा सदस्य अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना राज्यात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. त्यानंतर सदर शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde News In Marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आता पुणे, अहमदनदर आणि पालघऱ येथील शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन येथे पदाधिकारी दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला. शिंदे म्हणाले, 'काही लोक म्हणतात की या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर आहे. त्यांना जे बोलायचं आहे ते बोलून मजा घेऊ द्या. आम्ही आमचं काम करत राहू'.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या संख्येने बाळासाहेबांच्या विचारांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. गेल्या महिन्याभरात घडलेल्या घडामोडी पाहिल्या. आम्ही देखील टीव्हीत पाहिल्या. एकनाथ शिंदेंनी राजकीय आत्महत्या केली असं सगळ्यांना वाटत होतं. हा डाव खतरनाक होता. काहीही होऊ शकत होतं. पण बाळासाहेबांची लढण्याची शिकवण होती. सावरकरांबाबत अपमानास्पद वक्तव्य केली जायची. बाळासाहेबांच्या विचारासाठी हे केलं. अडीच वर्षात आपल्याला काय मिळालं ? पक्ष संपणार होता, तो वाढला'.

'आपण अडीच वर्षांपूर्वी आपण भाजपसोबत जायला हवं होतं. त्यांच्यासोबत आम्ही आता गेलो. आम्हाला बरीच दूषणे लावली, पण आम्ही शांत राहिलो. पण याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही, असं नाही. आम्ही जहाल बोलू शकतो. पण आम्ही विकास कामातून व्यक्त होऊ.

आमच्या पदाधिकाऱ्यांवर सत्ता असून गुन्हे होते. ते घालवता येत नव्हते. माझं सभागृहातील भाषण आपण ऐकलं असेल. ओके झालं होतं. जिथे जाईन तिथे रस्त्यावर लोक भेटताहेत. 'आप आगे बढो, हम साथ है' या आशयाच्या घोषणा देताहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. हा शब्द आहे. मी तुमच्या सारखा कार्यकर्ता आहे. गर्दी म्हणजे माझं टॉनिक आहे', असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

'आता एकही शिवसैनिकांच्या केसाला धक्का लावू देणार नाही. ज्या माध्यमातून ज्या योजनेतून लोकांना फायदा होईल, त्या योजना जनतेसाठी राबवणार. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा देऊन ते आपल्याकडे आले होते. त्यांना आपण परत नेते केलं आहे.

आज कार्यकारणी आपण केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण पाठिंबा आपल्याला दिला आहे. सगळी मदत आपल्याला करणार असल्याचा शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिलेत, विकास आपण चांगला करू', असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT