Eknath Shinde and ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकार जोरदार हल्लाबोल केला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येऊन १ महिना लोटला आहे. तरीही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाही. त्यामुळे राज्याचा कारभार केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे चालवत आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकार जोरदार हल्लाबोल केला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath shinde News)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील मुख्यमंत्र्यांची निती आयोगाची बैठक पार पडली. या निती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. सध्या राज्यात दोघेच जण सरकार चालवत आहेत. तर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या अजित पवारांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, 'अजित पवार म्हणत होते, तुम्ही दोघे फार पटकन निर्णय घेत आहे. त्यांनी आमच्या कामांचं कौतुक केलं. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची समस्या घेऊन माझ्या जवळ आले होते. त्यावेळी माझी अजित पवारांशी भेट झाली. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असले तरी त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत'.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का ? या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'यात कोर्टाचा काही विषयच नाही. कोर्टात मंत्रिमंडळाबाबत कोणताही चर्चा होत नाही. तशी कोर्टाकडून स्थगिती देखील नाही. जे काही विरोधी पक्षांना वाटत आहे, तसं नाही आहे'. भाजपच्या नेतृत्वामुळे उशीर होत आहे का ? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आम्ही नवीन सरकार स्थापन केलं आहे. आम्हाला सत्तेवर येऊन केवळ १ महिना झाला आहे. थोडा तरी वेळ द्या. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.'

भाजपने लोकसभेसाठी मिशन ४८ सुरू केलं आहे ? यावर मुख्यमंत्री म्हणाले,'हे शिवसेना आणि भाजपचं मिशन आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालेलं आहे. दोन्ही पक्ष मजबुतीने काम करणार आहे. लोकसभेच्या मिशन ४८ बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT