sanjay raut and eknath shinde
sanjay raut and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: CM एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजानांही दाढी होती...

विकास काटे, ठाणे

Eknath Shinde News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावरकर गौरव यात्रेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? असा सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला होता. संजय राऊतांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेनंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सावरकर गौरव यात्रेतच्या माध्यमातून सेल्युलर जेल येथे ठेवण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरक कट्टर देशभक्त होते. त्यांचा विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपमान करणे म्हणजे देशवासियांचा अपमान आहे'.

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पोहचावे यासाठी यात्रा काढली. त्यांना सडेतोड उत्तर मिळालं पाहिजे यासाठी यात्रा काढली. मणिशंकर अय्यर यांनी अपमान केल्यावर बाळासाहेबांनी आंदोलन केलं होतं, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर देखील टीका केली. 'वज्रमूठ नाही, ही तर वज्र्झूठ सभा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केली. यांच्या सभेमुळे बाळासाहेब ठाकरे यांना वाईट वाटत असेल. हे दुर्दैव आहे. जनता सुज्ञ आहे, चोख उत्तर मिळेल,असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांच्या सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे, या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांनाही दाढी होती, हे संजय राऊत विसरले का? असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.

'याआधी आयोध्येला जाताना काही आमदार आणि मंत्र्यांना विमानतून उतरवलं होंतं. त्यांची दर्शनाची संधी हुकली होती. त्यामुळे आम्ही आता पुन्हा 9 तारखेला आयोध्येला जातोय, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

'सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार करताना पुरोगामी आणि विज्ञानवादाला आधार दिलेला आहे. सावरकरांनी शेंडी जाणव्याच हिंदुत्व ते बाळासाहेबांनी देखील मानलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? आता या रॅलीमध्ये एकनाथ शिंदे हे दाढी काढून येणार आहेत का? तुम्ही सावरकरांच्या विचारांची यात्रा काढत आहात मात्र तुम्ही सावरकरांचे साहित्य वाचले आहेत का?, असे प्रश्न राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde News: मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी; पंकजा मुंडे कडाडल्या

Curry Leaves: सकाळी खा कढीपत्ता अन् आरोग्याच्या समस्या करा दूर

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Health Insurance: आरोग्य विम्याचा लाभ मिळेना; ४३ टक्के लोकांचे दावे रखडले, अहवालातुन धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT