Nana Patole Mahavikas Aaghadi Rally
Nana Patole Mahavikas Aaghadi Rally SAAM TV

Maharashtra Politics : मविआच्या वज्रमुठ सभेला नाना पटोलेंची ऐन वेळेवर दांडी; काय आहे कारण?

Nana Patole News : महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
Published on

Maha Vikas Aghadi News : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (2 एप्रिल) महाविकास आघाडीची जाहीर 'वज्रमूठ सभा' होणार आहे. सांस्कृतिक मंडळ मैदानावर थोड्याच वेळात या सभेला सुरूवात होणार आहे. सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते रवाना झाले आहेत. दरम्यान, सभेआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

Nana Patole Mahavikas Aaghadi Rally
Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर कोण करतंय दगडफेक? वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. नाना पटोले यांची तब्येत खराब असल्याचे कारण काँग्रेस कडून सांगण्यात येत आहे. अचानक पटोले यांनी सभेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐनवेळी वज्रमुठ सभेकडे पाठ फिरवली आहे. नाना पटोले यांची तब्येत बरी नसल्याचं काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. वज्रमुठ सभेची जय्यत तयारी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अचानक दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. (Maharashtra Political News)

Nana Patole Mahavikas Aaghadi Rally
Dhirendra Krishna Shastri: धक्कादायक! पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे दर्शन न झाल्याने महिलेने स्वत:ला संपवलं

संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. संभाजीनगरमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. त्यामुळं या सभेवेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फैजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून, राजकीय नेते आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com