CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde: आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका दुटप्पी, 'म्हणूनच त्यांनी...'; CM एकनाथ शिंदे यांची टीका

CM Eknath Shinde On Reservation: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केलीय.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीका केलीय. विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्यामुळे त्यांनी बैठकीला येण्याचं टाळलं असल्याची टीका शिंदेंनी केलीय. आरक्षणासंदर्भात १० टक्के आरक्षण इतर कोणत्याही समाजाचे कमी न करता दिले आहे. कोर्टाने स्टे दिलेला नाही. जस्टिस शिंदे समिती काम करत आहे. कालच्या बैठकीत अनेक मुद्दे आलेत, त्यावर काम सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.

बारामतीत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आज पंढरपुरमधील तयारीचा आढावा घेणार आहोत. लाखो वारकरी संप्रदायाची आषाढी एकादशीच्या दिवशी गैरसोय नको. म्हणून प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देतोय, तसंच टोल माफी (Aashadhi Wari) यंदा केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.

विशालगडासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझं जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झालंय. संभाजीराजे यांच्याशी देखील याबाबत चर्चा झालीय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले आपले ऐश्वर्य (CM Eknath Shinde) आहेत. शासन याबाबत नक्की विचार करत आहे. या गडाबद्दल काही गोष्टी न्यायालयात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी (PM Modi Mumbai Visit) प्रथमच मुंबईत आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. काल अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालंय. १० लाख लोकांना नोकरी मिळेल, हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात असल्याचं त्यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत आम्ही आणखी काम करू आणि जिंकून येऊ, असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात काहीही गोंधळ झालेला नाही. सगळ्या अटी सुटसुटीत केल्या असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं आहे. जुना डाटाबेस वापरणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं (Ladki Bahin Yojana) आहे. योजना अगदी सुटसुटीत झालेली आहे, यात कुठलीही गडबड नाही. लाडकी बहिण योजना प्रसिद्ध होईल, याची सर्व तरतूद सरकारने केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT