Cm Eknath Shinde On Manoj Jarange Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Cm Shinde On Manoj Jarange: 'मुख्यमंत्री असतानाही मी इगो ठेवला नाही, मात्र आता त्यांची जी भाषा आहे...' जरांगे यांच्याबद्दल काय म्हणाले CM शिंदे

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज मसुरकर

Cm Eknath Shinde On Manoj Jarange Patil:

''जरांगे पाटील एक प्रामाणिक भावना घेऊन या लढ्यात उतरले आहेत, अशी आमची भावना होती. अनेक वेळा मागण्या बदलत गेल्या. आता मुख्यमंत्री म्हणून मी भेटायला गेलो. ५६ मोर्चे शांततेत झाले. यावेळी कुठे आग लावली, दगडफेक झाली. मराठा समाज संयमी आहे. पण त्याला गालबोट लावण्याचं काम करत आहेत, तरूणांनी सावध राहिले पाहिजे, या माझ्या सूचना आहेत'', असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले आहेत.

जरांगे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''मुख्यमंत्री असतानाही मी इगो ठेवला नाही. आता त्यांची भाषा ही राजकीय झाली आहे. त्यांच्या मागे कोणीतरी आहे, असा वास येतोय. अशा प्रकारचे वक्तव्य ही संस्कृती नाही. त्यांना कोणी बोलायला लागतंय का?''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे म्हणाले, ''फडणवीसांनी खुप प्रयत्न केले. असे खालच्या पातळीवर आरोप महाराष्ट्र सहन करत नाही. विरोधीपक्षाला अपेक्षित नव्हत की, एवढ्या लवकर आणि १० टक्के आरक्षण मिळेल. रात्रंदिवस अधिकारी काम करत होते. सरकारने काय केलं नाही ते सांगा.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''आंदोलण करणाऱ्यांना कायदा हातात घेता येणार नाही. प्रत्येकाने मर्यादेत राहिलं पाहिजे. याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. सरकारला काही माहित नाही, असा विचार करु नका. जे कोणी जवाबदार असतील त्यांना सरकार माफ करणार नाही.''

जरंगे पाटील सागर बंगल्यावर येणार असल्याचं म्हटलं आहे. यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारला असताना ते म्हणाले, ''पोलीस आणि गृहविभाग जे करायचं ते करतील.''

अजित पवार काय म्हणाले?

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ''मराठा आरक्षणबद्दल सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्री यांनी शपत घेतली. सर्व यंत्रणा कामाला लागली. आपण काय बोलतोय कशा पद्धतीने बोलतोय, आपण कशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरतोय, मी अस कधी बघितले नाही. राज्याचे प्रमुख दोन वेळा भेटायला गेले. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहायला हवी.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'दसरा मेळाव्यात शाहांचा फडशा पाडणार', उद्धव ठाकरे अमित शहांवर कडाडले

Ramdas Athawale: 'आंबेडकरांनी आरपीआयचं नेतृत्व करावं', रामदास आठवलेंची आंबेडकरांना ऑफर

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

SCROLL FOR NEXT