eknath shinde, sharad pawar, Latest Marathi News. Maharashtra Political News
eknath shinde, sharad pawar, Latest Marathi News. Maharashtra Political News saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra : चर्चाच चर्चा ! शरद पवारांच्या भेटीबाबत एकनाथ शिंदेंचं ट्विट

विकास काटे

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती. ही भेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झाल्याची चर्चा हाेती. या भेटीत दाेन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची देखील काही माध्यमांतून (साम टीव्ही नव्हे) सांगितले जात हाेते. दरम्यान या भेटीबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट (tweet) करुन जनतेपर्यंत माहिती पाेहचवली आहे. (eknath shinde latest marathi news)

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माझी भेट झालेली नाही. हे वृत्त संपूर्णपणे चुकीचे असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. काहींनी माझे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एक छायाचित्र व्हायरल केले आहे. ते छायाचित्र मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचे आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Latest News And Updates On Sharad Pawar)

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीच्या वृत्तानंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे लिहितात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (साहेब) यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या भेटीच्या चर्चेस पुर्ण विराम मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या एकाला अटक

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

SCROLL FOR NEXT