Farmer NAMO Yojana Saam TV
मुंबई/पुणे

Namo Shetkari Yojana: जय किसान! नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी, प्रत्येकाला ₹ १२००० मिळणार

Maharashtra State Government Scheme: नमो योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे.

प्रविण वाकचौरे

Namo Shetkari Government Scheme:

दिवाळीआधी शेतकऱ्यांना शिंदे सरकाने मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सराकरने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

नमो योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळणार आहे. (Latest Marathi News)

एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना आता नमो आणि पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना घोषणा केली होती.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. (महिला व बालविकास)

  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. (जलसंपदा विभाग) (Political News)

  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग)

  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार (परिवहन विभाग)

  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन (महसूल व वन विभाग)

  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता (उच्च व तंत्र शिक्षण)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT