uddhav thackeray And eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड...'; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

काही शिवसेना नेत्यांनी शिंदे यांना रिक्षावाला म्हणत भरसभेत टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारने काल विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली. या बहुमत चाचणीनंतर सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधीपक्षनेते आणि अन्य नेत्यांची भाषणं झाली. त्यावेळी शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. तर खासदार संजय राऊत आणि अन्य काही शिवसेना नेत्यांनी शिंदे यांना रिक्षावाला म्हणत त्यांच्यावर भरसभेत टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ( Eknath Shinde News In Marathi )

एकनाथ शिंदे सरकारने काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. कालचा पूर्ण दिवस सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या भाषणांमुळे चांगलाच रंगला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक किस्से सांगितले या भाषणामध्ये प्रामुख्याने त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली वागणुकीबद्दल भाष्य केलं होतं. तसेच बंडखोरीनंतर काही शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला म्हणत भरसभेत टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शिवसेना नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार', असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

एनडीआरएफसह इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT