'उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यात... '; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

'मी सरकारमध्ये राहणार नाही हे ठरलं होतं. पक्षाची इच्छा होती की, सरकारच्या बाहेर राहून सरकार चालवू नये. मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यात मला काही कमी पणा नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
devendra Fadnavis
devendra Fadnavis saam tv

नागपूर : 'मी सरकारमध्ये राहणार नाही हे ठरलं होतं. पक्षाची इच्छा होती की, सरकारच्या बाहेर राहून सरकार चालवू नये. त्यामुळे मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यात मला काही कमीपणा वाटत नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा नागपुरात (Nagpur) गेले. त्यावेळी त्यांचे समर्थकांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर फडणवीस यांनी महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली. (Devendra Fadnavis News In Marathi )

या पत्रकार परिषदेत नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र , चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांशी संवाद साधला.

devendra Fadnavis
मुख्यमंत्री नेमका कोण? व्हायरल Video ट्विट करत काँग्रेसने शिंदे-फडणवीसांना डिवचलं

त्यावेळी फडणवीस म्हणाले, ' आम्ही विश्वासदर्शक ठराव प्रचंड मताने जिंकला आहे. २०१९ मध्ये युतीला बहुमत असताना अनैसर्गिक युती झाली. त्यावेळी मला कुठलाही खेद नव्हता की, मी मुख्यमंत्री होऊ शकलो नाही. पण सरकारने विकासाचे प्रकल्प थांबविल्यामुळे वाईट वाटत होतं.

मविआ सरकारने विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागास भागावर अन्यायाला सुरुवात केली. सरकार जाण्यापेक्षा महाराष्ट्र मोदींच्या विकासात जाण्यापासून थांबला याचं दु:ख रोज असायचं. त्यामुळे सक्षम विरोधीपक्ष नेता म्हणून काम केलं. कोरोना काळात एकही दिवस घरी बसलो नाही. प्रत्येक जिल्ह्यात गेलो, जीवाची पर्वा न करता भेटी दिल्या'.

devendra Fadnavis
Ashadhi Wari 2022 : घरापासून करता येणार पंढरपूरपर्यंत प्रवास; जाणून घ्या एसटीचा उपक्रम

'बाळासाहेबांनी सांगितलेल्या हिंदुत्वापासून फारकत घेतली, याची अस्वस्थता सतत होती. याचा फायदा इतर पक्ष घेत होते. हे बंड नव्हतं हा उठाव होता, आम्ही त्याला सोबत दिली. आम्ही सत्तेकरिता हपापलेले नाही. आम्ही ठरवलं असतं तर आमचा मुख्यमंत्री असता.

मात्र, मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाने मान्य केला. मी सरकारमध्ये राहणार नाही हे ठरलं होतं. पक्षाची इच्छा होती की, सरकारच्या बाहेर राहून सरकार चालवू नये. मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यात मला काही कमीपणा वाटत नाही', असे फडणवीस यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com