Cm Eknath Shinde News Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Andolan: जालन्याच्या घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलवली आज महत्वाची बैठक

Satish Kengar

>> सुरज सावंत

Cm Eknath Shinde On Maratha Reservation: 

जालन्याच्या घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्वाची बैठक होणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित रहाणार.

याच बैठकीत मराठवाडा विभागीय आयुक्त, आणि छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक, असे सर्व वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी हे VC उपस्थित राहतील, अशी माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आज आज मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. महाजन यांनी त्यांना तुमची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं आहे.

महाजन म्हणाले आहेत की, ''तीन महिने झाले अधिकाऱ्याच्या बदल्यात झाल्या. त्यामुळे समितीचे काम संत गतीने सुरु झालं. अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि माहिती अधिकारी जसा आणला ते ही लगेचं झाले नाही, त्या प्रक्रियेला ही वेळ गेला. अत्ता तीन महिन्यात सरकार आलं. त्या अगोदर सरकार वेगळं होत. आमचं सरकार असताना आम्ही निर्णय घेतले. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत गेलो. मात्र मागच्या सरकारने काहीच केले नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT