CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde News Saam tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील सभेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. 'मुख्यमंत्र्यांना भाषण वाचता येतं, पण शेतकऱ्याचं रक्ताने लिहिलेले पत्र वाचता येत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) भेट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मालेगावातील सभेवर भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. मशिदीवरील भोंगे याबाबत चर्चा झाली. नियमानुसार असेल ते केले जाईल. मनसे कार्यकार्यकर्त्यांवर ज्या केसेस टाकले आहेत. त्या तपासून घेतल्या जातील. कोणावरही अन्याय करणार नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे'.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मालेगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मी सभा घेत नाही. तर मी विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. मी कामच करत आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर योग्यवेळी बोलेल'.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. 'स्वत:च्या रक्ताने शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पण रक्ताने पत्र लिहूनही मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही. भाषण बरं वाचता, पण माझ्या शेतकर्‍याच पत्र वाचू शकत नाही? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patients Relatives Beaten Nurse: वॉर्डमधून बाहेर काढल्याने राग आला; रुग्णासहित नातवाईकांकडून नर्सला मारहाण

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT