Bhabha Hospital Mumbai : नातेवाइकांना वॉर्डमधून बाहेर काढल्याने रुग्ण महिला चिडली; नर्सला मारहाण

Patients Relatives Beaten Nurse in baba hospital kurla : भाभा रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर नर्सच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कामबंद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Patients Relatives Beaten Nurse :
Patients Relatives Beaten Nurse :Saam tv

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील कुर्ल्यामधील मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णासहित नातेवाईकांनी नर्सला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. भाभा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर नर्सच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कामबंद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ल्यामधील भाभा हॉस्पिटलमधील महिला रुग्णाने नर्सला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहिनी मातेरे असे नर्सचे नाव आहे. तर आयेशा कुरेशी असे महिला रुग्णाचे नाव आहे. रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये सर्व घटना घडली.

Patients Relatives Beaten Nurse :
Pimpri Chinchwad Crime News: कासरवाडीच्या युवकांकडून वाहनाची तोडफोड, पाच जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक

नेमकं काय घडलं?

वॉर्डमध्ये साफसफाई आणि इंजेक्शन द्यायची वेळ झाल्यामुळे नर्सने नातेवाईकांना बाहेर जायला सांगितलं. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना राग आला. नातेवाइकांना बाहेर काढल्यामुळे रुग्णाने स्वत:ची आयव्ही लाईन काढून मला घरी सोडण्यात यावे, असे सांगितले.

यावेळी रुग्ण आणि नातेवाइकांकडून नर्सला अपशब्द वापरण्यात आले. नर्सला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न कोण घेणार, त्यामुळे आम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षारक्षक हवा,' अशी मागणी त्यांनी केली.

Patients Relatives Beaten Nurse :
Parbhani Crime News : परभणी हादरलं! शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

अर्ध्या स्टाफचं कामबंद आंदोलन

रुग्णालयातील सर्व नर्सकडून घडलेल्या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत रुग्णाववर कारवाई होत नाही, तोपर्यंत रुग्णालयामधील अर्ध्या स्टाफचं कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. अनेक नर्स या रुग्णालयाबाहेर येऊन आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत.

तत्पूर्वी, रुग्ण आणि नातेवाइकांनी नर्सला मारहाण केल्यानंतर वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आणि नर्स यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. या आंदोलनानंतर रुग्णालयामध्ये स्थानिक पोलीस पोहोचले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com