Eknath Shinde News:  Saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; उद्या CM शिंदे यांच्या हस्ते होणार अनावरण

Eknath Shinde News: भारत-पाकिस्तान सीमेवर ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे.

Vishal Gangurde

Eknath Shinde News:

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत. आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

२० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याला २२०० किमी अंतर पार केल्यानंतर कुपवाडा येथे पोहोचवण्यात आलं आहे. यावेळी शहारीत काही ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले.

उद्या ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा,मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचं भूमीपूजन पाडव्याच्या दिवशी करण्यात आलं होतं. पुतळ्याच्या पूजनासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती.

पुतळा साडे दहा फूट उंचीचा आहे. हा पुतळा ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

तत्पूर्वी, या पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलीकडे पाकिस्तान देश आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे, अशा पद्धतीनं हा पुतळा बसविण्यात आलाय.

त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला आहे. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT