Mumbai Air Pollution: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीत फक्त 3 तास फटाके फोडता येणार, वाचा सविस्तर

Bombay High Court on Fire Crackers: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीत फक्त 3 तास फटाके फोडता येणार, वाचा सविस्तर
Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire CrackersHC on Fire Crackers - Saam Tv
Published On

Bombay High Court On Mumbai Air Pollution:

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आवाज करणारे फटाके वाजवण्यास सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. यासोबतच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबईतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईतील वायू प्रदूषणाशी संबंधित रिपोर्ट्स येत आहेत. ज्यात या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर हायकोर्टाने या सूचना केल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Chhattisgarh Election 2023: काँग्रेस पक्ष छत्तीसगडमध्ये दुबई हवालाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे, स्मृती इराणी यांचा आरोप

दिवाळीपर्यंत मुंबईतील सर्व बांधकामे राहणार बंद

मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे की, ''विकासकामांपेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. काही दिवस बांधकाम थांबवले तर स्वर्ग कोसळणार नाही.'' राज्य सरकार आणि बीएमसीच्या वकिलांनी केलेल्या आवाहनानंतर हायकोर्टाने सांगितले की, आम्ही पुढील चार दिवस हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर लक्ष ठेवू. चार दिवसांनंतरही AQI कमी न झाल्यास पुढील चार दिवस सर्व विकासकामे थांबवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, बीएमसीला मुंबईतील 6,000 हून अधिक बांधकाम साइट्सवर प्रदूषण होत असल्याचं आढळलं आहे. यानंतर त्यांना 20 ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये अँटी स्मॉग गन, बांधकामाच्या ठिकाणी फवारणी, दररोज पुनर्वापर केलेल्या पाण्याने सर्व 650 किमी प्रमुख रस्ते स्वच्छ करणे इत्यादींचा समावेश आहे.

स्थानिक मंडळाच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मुंबईतील 78 टक्के घरांमध्ये किमान एक व्यक्ती वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहे. वायू प्रदूषणामुळे 44 टक्के लोकांनी डोळ्यात जळजळ होत असल्याचं सांगितलं आहे. या आजारांसाठी 85 टक्के लोकांनी बांधकाम साइटला दोष दिला आणि 62 टक्के लोकांनी वाहन उत्सर्जनाला दोष दिला आहे.

Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Diwali Chakali Recipe: कुरकुरीत आणि चविष्ट भाजणीची चकली कशी बनवायची?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com