shinde-Fadnavis Cabinet Expansion
shinde-Fadnavis Cabinet Expansion saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार होणार; १९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता

Rashmi Puranik

Maharashtra Cabinet Expansion : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर लांबणीवर पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालामुळं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. पण आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. शिंदे सरकार स्थिर असून, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे, असे जवळपास स्पष्ट झाले आहे. (Breaking Marathi News)

सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे लवकरच आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सत्तासंघर्षाचा खटला सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. आता निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

१९ मंत्री घेणार शपथ

राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी शिंदे गटातील आमदारांमध्ये अहमहमिका लागली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात १९ जणांचा शपथविधी होणार आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

SCROLL FOR NEXT