CM eknath shinde devendra fadanavis ajit pawar viral video before maratha reservation pc Saam TV
मुंबई/पुणे

बोलून मोकळं व्हायचं...! मराठा आरक्षणासंबंधी पत्रकार परिषदेआधीचा CM शिंदे-फडणवीस-पवार यांचा VIDEO व्हायरल

Eknath Shinde Viral Video: आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या व्हिडीओवरुन तिघांनाही प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

Satish Daud

Eknath Shinde Viral Video: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. मराठ्यांनी केलेल्या मागण्यांवर सरकार गंभीर आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार पत्रकारपरिषदेत सांगत आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांकडून केली जातेय. अशातच ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वी गप्पा मारताना दिसून येत आहे. आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या व्हिडीओवरुन तिघांनाही प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

"मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे", असं म्हणत ओमराजे यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. (Latest Marathi News)

'मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे', अशी टीका देखील ओमराजे यांनी केली आहे

'एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय...' असा इशाराही ओमराजे यांनी सरकारला दिला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात सह्याद्री अतिथिगृहावर सोमवारी रात्री सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेतली. मात्र, पत्रकारपरिषद सुरु होण्याआधी तिघांनी चांगल्याच गप्पा मारल्या. यामध्ये एकनाथ शिंदे हे आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं. असं म्हणताना दिसून येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर अजित पवार हो……येस असं बोलताना दिसून येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू आहे, असं म्हणत दोघांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तिघांनाही नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. अनेकांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT