CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde News: अनेक वर्षांची घाण आम्ही स्वच्छ करतोय, उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर CM एकनाथ शिंदेंचा निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Modi inaugurate Mumbai Trans Harbor Link flyover

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या उड्डाणपुलाचं लोकार्पण 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. त्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी या पूलाची पाहणी केलीय. याप्रसंगी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवलीय. याआधी अडीच वर्ष जेव्हा लोकं घरात बसून होते, तेव्हा कामं बंद होती, ती कामं आम्ही सुरू केली. अनेक वर्ष यांनी केलेली घाण आम्ही स्वच्छ करतोय, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर (Uddhav Thackeray) निशाणा साधलाय.

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणतंही काम करत नाही असं ते म्हणाले. हा पूल आता पूर्ण झालाय. या आधीचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले, तेव्हा निवडणूक होती का? असा प्रश्नही शिंदेंनी विचारला. (latest political news)

या पूलामुळंं दीड ते दोन तासाचा रस्ता अवघ्या पंधरा मिनिटात पार होईल. शिवडीतील माणूस रायगड मध्ये जाईल. तिथून पुढे हा मार्ग मुंबई पुणे व मुंबई गोवा या महामार्गांना कनेक्ट होणार आहे. वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडोर आहे. त्यालाही हा कनेक्ट होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ, इंधन याची बचत होईल. मुंबई आणि चिरले हा परिसर जवळ येईल. दोन तासांचे अंतर पंधरा मिनिटात पार होईल. तिथे ग्रुप सेंटर, सर्विस इंडस्ट्री होतील. मोठ्या प्रमाणात वसाहती होतील, लोकांना याचा फार मोठा दिलासा मिळेल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं (CM Eknath Shinde) आहे

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं भूमिपूजन केलं होतं. याचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होतंय, याचा आनंद होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी पंतप्रधान मोदी लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून आम्ही या प्रकल्पाची आज पाहणी करत आहोत. मुंबईतील आणखी काही प्रकल्प आहेत, त्यांचंही लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे. त्यामुळं हा मोठा कार्यक्रम आहे. हा प्रकल्प वरळी व नरिमन पॉईंटपर्यंत पुढे कनेक्ट होतोय. त्यामुळे नरिमन पॉईंटमधील माणूस अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात रायगडमध्ये पोहोचणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


पर्यावरण पूरक प्रकल्प

हा एक पर्यावरण पूरक प्रकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही लोकांनी या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो कमी होतील, असा आरोप केलाय. पण आम्ही रिवर सर्क्युलेशन ड्रिल वापरलीय. प्रोटेक्शन वॉल उभारली आहे. नॉईज बॅरिअल लावले आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो कमी होण्याऐवजी वाढले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केलाय. त्यामुळं हा देशातील नंबर एकचा प्रकल्प आहे.

सीएम ऑन लोकसभा निवडणूक

पंतप्रधान एक वर्षापूर्वी सुद्धा आले होते. तेव्हा निवडणुका होत्या का? असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी विचारला. विरोधी पक्षाला काही काम धंदा नाही. त्यांच्याकडे फक्त आरोप करायचं काम आहे. आम्ही त्यांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही. आमचं काम सुरू आहे. जनता सुज्ञ आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या. आम्ही आमचं काम करू, असं त्यांनी म्हटलंय.

सीएम ऑन शिवसंकल्प अभियान

आमचं बिगुल कामानं वाजलंय. कामानेच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळं खोटी आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचं काम आम्ही करत नाही. आम्ही प्रत्यक्षात काम करत आहोत. शासन आपल्या दारी याचं उदाहरण आहे. 500 स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि मुंबई महापालिका शाळांमध्ये सुद्धा सेंटर सुरू केलंय. निवडणुका बघून नव्हे, तर लोकांना काय पाहिजे ते पाहून आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे सहा हजार रुपये पिक विमा, या निर्णयावेळी देखील निवडणुका नव्हत्या. आम्ही सर्व निर्णय जनतेसाठी घेत आहोत. हे जनतेत उतरून काम करणारं सरकार आहे, घरात बसून आदेश देणारं नाही असं ते म्हटले.

डीप क्लिन मोहिम टप्प्याटप्प्यानं मुंबईसहित महाराष्ट्रात राबवणार आहोत. लोकांच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं आहे. यामुळं काही लोकांचं आरोग्य मात्र बिघडत आहे, त्यांना पोटदुखी होतेय. क्लीन स्वीप होईल, म्हणून त्यांची चिंता वाढली आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सीएम ऑन महाविकास आघाडी

महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी (PM Modi) आहेत. जे मागील ५०-६० वर्षात झालं नाही. ते मोदींनी ९ वर्षात केलंय. ४ राज्यात मोदी गॅरंटी चालली, इतर गॅरेंटी चालली नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये पार आडवे केले. आता लोकांनी मोदींची गॅरंटी दिलीय. अब की बार मोदी सरकार, ४०० पार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT