National Youth Festival: नाशिकमध्ये 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचं' आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

National Youth Festival News: नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी दरम्यान २७ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या युवा महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनच्या अनावरण सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
National Youth Festival
National Youth FestivalSaam Digital
Published On

National Youth Festival

नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी दरम्यान २७ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या युवा महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनच्या अनावरण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात उद्घाटनाचा सोहळा पार पडणार असून अनावरण सोहळ्याला केंद्रीय क्रीडा व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. तर लोगो अनावरण सोहळ्याला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड शो

या महोत्सवा निमित्त १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड शो होणार आहे. विभागीय क्रीडा संकुल हेलिपॅड ते मोदी मैदानावरील सभा स्थळापर्यंत तब्बल दीड किलोमीटर हा रोड शो होणार आहे. रोड शोच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांचे रणशिंग मोदी नाशिकमधून फुंकणार असल्याची शक्यता आहे.

National Youth Festival
Jitendra Awhad Controversial Statement: वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत, पुणे, शिर्डीत गुन्हे दाखल

२७ व्या युवा महोत्सवाचे लोगो आणि मॅस्कॉट याचे अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पूर्ण तयार, यात कुठलीही कमी राहणार नाही. तीन मंत्र्यांनी तिथे मुक्काम ठोकला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करण्याचे आपले प्रयत्न आहेत. १६ वर्षांनंतर महाराष्ट्राला ही संधी मिळाली. या महोत्सवासाठी २० समित्या गठीत. या कार्यक्रमाचा मोठा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. हेलिपॅड ते सभा मैदान पर्यंत रोड शोचे आयोजन. या सोहळ्यासाठी दीड ते दोन लाख लोक येण्याची शक्यता, त्यांनी व्यक्त केली.

National Youth Festival
Jarange Warn Drunkards: 'तुम्ही मला पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या, आरक्षण मिळालं की त्यांची खैर नाही...', जरांगेंनी वळवला दारूवाल्यांकडे मोर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com