CM Eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: 'मुंबईला १५ वर्षे ओरबाडले, मुंबईकरांची लूट केली आणि आता...'; ठाकरे गटाच्या मोर्चावरून मुख्यमंत्र्यांची टीका

'मुंबईवर गेली १५ वर्षे सत्ता असताना मुंबईला ओरबाडून काढले, मुंबईची लूट केली व आता हिशेब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढले जात आहेत,अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्याची 'एसआयटी'मार्फत चौकशी होणार आहे. पालिकेतील घोटाळ्याच्या आरोपानंतर ठाकरे गटाने शिंदे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी महापालिकेवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर चौफेर टीका केली आहे.

'मुंबईवर गेली १५ वर्षे सत्ता असताना मुंबईला ओरबाडून काढले, मुंबईची लूट केली व आता हिशेब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढले जात आहेत,अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत थांबलेली, थांबवलेली विकासकामे मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. शिवसेना भाजपचे युती सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या च्या पायाखालील वाळू सरकत आहे. ११ महिन्यात इतके काम झाले तर पुढील कालावधीत किती काम करतील व त्याचा काय परिणाम होईल, असा धसका विरोधकांनी घेतला आहे'.

'मुंबईवर गेली १५ वर्षे सत्ता असताना मुंबईला ओरबाडून काढले, मुंबईची लूट केली व आता हिशेब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढले जात आहेत, जनता या नाटकीपणाला फसणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. खरे पाहता मुंबईकरांना इतकी वर्षे लुटल्यामुळे तुमच्याच घरांवर मोर्चा काढायला हवा आहे, असे त्यांनी ठणकावले.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी माजी नगरसेवक संजय अगलदरे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'आमचे सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील रस्ते क्रॉंकिटीकरणाचा निर्णय घेतला. हा निर्णय १५ वर्षांपूर्वी घेऊन काम केले असते तर मुंबई महापालिकेची साडेतीन हजार कोटींची बचत झाली असती, असे ते म्हणाले. निर्णय वेळेवर न घेतल्याने मुंबईकरांना वर्षानुवर्षे खड्डेमय रस्त्यांवर प्रवास करावा लागला, त्यामुळे विविध अपघातात बळी गेले ते वेगळे, असे ते म्हणाले.

'गेल्या सरकारच्या काळात मेट्रो व कारशेड प्रकल्प अडीच वर्षात पूर्णपणे ठप्प होते. रस्त्यांची कामे, क्रॉंक्रिटीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी विविध लोकाभिमुख कामे पूर्ण व्हायला हवी होती. मात्र संधी असूनही ही कामे ठप्प होती. कोव्हिड काळातल्या गैरकारभाराची ईडी चौकशी करत आहे. कोविडमध्ये माणसे मरत होती, मात्र त्यावेळी काही जण केवळ पैसा कमावण्यात लागले होते. तीच मंडळी आता आम्हाला प्रश्न करत आहेत हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डांटे, अशी परिस्थिती आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेवर दिले.

'गेल्या १५ वर्षे मुंबईकरांना नुकसान झाले, मोठा त्रास भोगावा लागला. मात्र आता विद्यमान राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे ते पुढे म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष राज्यात येत असल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, निवडणुका लढवायची सर्वांना मुभा असते, मते द्यायचा अधिकार मतदारांना असतो. के.सी.आर. यांनी आधी त्यांचे राज्य, पक्ष सांभाळावा, त्यांच्या राज्यातील नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत, अशी टीका शिंदे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT